महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा होणार- प्रा. राम शिंदे रविवार, १३ मे, २०१८
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड येथे साजरी करण्यात येते. यावर्षी देखील हा जयंती महोत्सव 31 मे रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार असून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीमधील सर्वपक्षीय सदस्य देखील उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, जयंती उत्सवासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री तथा आमदार गणपतराव देशमुख, खासदार छत्रपती संभाजीराजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीक्षेत्र चौंडी एक पर्यटनस्थळ होत असून येथील सर्व अंतर्गत रस्ते तसेच इतर रस्त्यांसाठी आठ ते दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच या क्षेत्रासाठीचा पर्यटन विकास आराखडा देखील मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा