महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
माजी कॅबीनेट सचिव दिवंगत बी.जी देशमुख यांना उत्तम प्रशासक पुरस्कार बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
नवी दिल्ली : माजी कॅबीनेट सचिव दिवंगत भालचंद्र गोपाल तथा बी. जी. देशमुख यांना उत्तम प्रशासकासाठी दिल्या जाणाऱ्या पॉल एच.ॲपलबी या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून पुरस्कार राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी स्वीकारला.

येथील भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत देशमुख यांनी केंद्र शासनामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांनी ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स ए लॉऊड’, ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराऊँड’, ‘ए पूना टू प्राइम मिनीस्टर ऑफीस’, ‘ए कॅबिनेट सेक्रेटरी लूक्स बॅक’ ही आणि इतर महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिलेली आहेत.

त्यांनी कॅबीनेट सचिव म्हणून केलेल्या कारर्कीदीत लोक प्रशासनात नव उपक्रमांची भर घातली आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त, केंद्र शासनात विविध पदांवर काम केलेले आहे, यासह महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

दिवंगत देशमुख यांनी राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, आणि चंद्रशेखर या तत्कालीन तीन प्रधानमंत्र्यांसोबत काम केलेले आहे. यासह अंतराराष्ट्रीय कामगार संगघटनेतही काम केले आहे.1985-86 दरम्यान दिवंगत देशमुख हे भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या क्षेत्रीय संस्थेवरही होते. त्यांनी या संस्थेला 10 लाख रूपयांचे दान दिले होते. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून दरवर्षी या संस्थेत बी.जी. देशमुखांच्या स्मृती प्रित्यर्थ वार्षिक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याशिवाय निबंध स्पर्धेचे आयोजनही केले जाते.

निवृत्तीनंतर देशमुख हे पुण्यात स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. शासनावरील जनतेचा विश्वास वाढावा यासाठी ‘पब्लीक कॅन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे. ते जनवाणीचे अध्यक्ष होते, यासह अनेक स्वयंसेवी संस्थेत अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम पाहिले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा