महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
"नमामि चंद्रभागा" माहिती व लघुपटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण शुक्रवार, १२ जुलै, २०१९

 

पंढरपूर : "नमामि चंद्रभागा" प्रकल्पावर निर्मित माहिती पट व लघुपटाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहिती आणि लघु पटांची निर्मिती करण्यात आली आहे.

माहिती पटात भीमा नदीचे महात्म्य  सांगण्यात आले असून पुढे पंढरपूर येथे ही नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. मात्र वाढत्या प्रदुषणामुळे नदीचे पावित्र्य राहिले नाही. त्यासाठी आपण सर्वांनी कोणती काळजी घ्यावी, याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय  मंत्री सुरेश  खाडे, पालकमंत्री विजय देशमुख आदी उपस्थित होते. डॉ.म्हैसेकर यांनी प्रास्ताविक केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा