महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री धनंजय मुंडेंनी प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिला दिलासा सोमवार, १६ मार्च, २०२०

उपोषणकर्ते व महानिर्मिती कंपनी प्रशासनात केली यशस्वी मध्यस्थी 

बीड : प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना महानिर्मीती कंपनीत कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी उपोषणार्थींची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी प्रशासनाच्या परळी वैजनाथ वीज महानिर्मिती केंद्राचे महाव्यवस्थापक एन. एम. शिंदे उपस्थित होते. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना फोनवरून बोलून वीज निर्मिती केंद्र प्रशासनाकडून उपोषणकर्त्याना दिलासा दिला.  पालकमंत्री धनंजय मुंडेंनी अधिवेशन संपताच 36 तासांत भेट घेऊन प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिलासा दिला आहे.

परळी वैजनाथ येथील वीज निर्मिती केंद्रासमोर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणास बसलेल्या  प्रकल्पग्रस्त  प्रशिक्षणार्थींचा प्रश्नी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडेंनी संबंधित महानिर्मिती प्रशासनाला दिले आहेत.

सर्व प्रकल्पग्रस्त व कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह 12 मार्चपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यांचे सविस्तर म्हणणे श्री. मुंडेंनी ऐकून घेतले व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तोडगा काढण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगर पालिकेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, बाजीराव धर्माधिकारी, सूर्यभान मुंडे, माणिक फड, श्रीकृष्ण कराड, विकास नागरगोजे, रामदास कराड आदी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा