महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रामदास आठवले यांनी वाहिली महामानवाला आदरांजली बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी आज संसद भवनात आदरांजली वाहिली.

संसद भवनात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ॲड.सुलेखा कुंभारे यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकृत ट्विटर हॅण्डल : http://twitter.com/micnewdelhi
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा