महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन शनिवार, १४ एप्रिल, २०१८
अलिबाग : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज अलिबाग येथील एस.टी.स्टॅण्ड जवळ असलेल्या पुतळ्यास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीधर बोधे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा