महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन शनिवार, १४ एप्रिल, २०१८
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मस्तगड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी खासदार रावसाहेब दानवे, नगराध्याक्षा संगिता गोरंट्याळ, आमदार राजेश टोपे, उप नगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आमदार अरविंर चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बलभीम शिंदे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष खांडेकर भास्कर आंबेकर, धनश्याम गोयल, विरेंद्र धोका आदींची उपस्थिती होती.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा