महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९


अकोला :
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा केंद्रीय मानव संसाधन, दूरसंचार, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाली.

यावेळी आमदार सर्वश्री हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, रणधिर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हरीप्रसाद मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येक विभागाने आपल्या विभागाची स्वतंत्र वेबसाईट तयार करून त्यामध्ये आपल्या विभागाच्या योजनांची माहिती तसेच लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करावी, असे निर्देश श्री.धोत्रे यांनी दिले. मागील इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल संबंधित विभागानी तत्काळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गजानन महल्ले यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा