महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आमदार नरहरी झिरवाळ यांची परिचय केंद्राला भेट गुरुवार, ११ जानेवारी, २०१८
नवी दिल्ली : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. झिरवाळ त्यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्यौत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. झिरवाळ यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल श्री. झिरवाळ यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा