महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील रस्त्यांचे पालकमंत्री यांचे हस्ते भुमिपुजन बुधवार, १३ जून, २०१८
अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील नविन अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी प्राप्त झालेल्या विशेष रस्ता अनुदानातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथील मुख्य प्रवेश द्वार ते देशमुख स्मृति केंद्र या रस्त्याचे डांबरीकरण व शास्त्री नगर गेट ते प्रशासकीय इमारतीपर्यंत तसेच शहिद स्मारक ते ॲग्रो इंजीनिअरींग कॉलेजपर्यंत अशा पंजाबराव कृषि विद्यापिठातील तीन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपुजन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

अकोला शहराच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला आमदार गोपीकिशन बाजोरीया, कृषि किर्तनकार महादेवराव भुईभार, वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, नगरसेवक हरिश अलिमचंदानी, आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे, कार्यकारी परिषदचे सदस्य गोपी ठाकरे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा