महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा - पालकमंत्री रवींद्र वायकर रविवार, ०८ सप्टेंबर, २०१९

 

 


रत्नागिरी : रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फुट उंच ध्वज उभारण्यात आलेला ध्वज रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या 100 फुट उंच ध्वजाच्या उदघाटनप्रसंगी श्री. वायकर बोलत होते. यावेळी आमदार हुस्नबानू खलिफेआमदार राजन साळवीजिल्हाधिकारी सुनील चव्हाणजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयलजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेउपविभागीय अधिकारी अमित शेडगेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता  कुलकर्णीउपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडेतटरक्षक दलाचे दांडेकरगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सुखटणकर उपस्थित होते.

 

श्री. वायकर म्हणालेगेली पाच वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना या जिल्ह्यातील नागरिकांनी व माझ्या सहकाऱ्यांनी  नेहमीच सहकार्य केले.  अनेक विविध प्रसंगामध्ये या जिल्ह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले.   निर्सगाचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा विकास सदैव होत राहीलअसेही त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा ध्वज उभारण्याच्या कामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. डी.के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी यांनी हा ध्वज उपलब्ध करुन दिला आहे याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले. 

 

20X  30 फूट आकाराचा हा ध्वज एनसीसी कॅडेटनी आणून पालकमंत्री वायकर व उपस्थित मान्यवरांकडे सुपूर्त केला यानंतर तांत्रिक पध्दतीने हा ध्वज ध्वजस्तंभावर चढविण्यात आला. 

 

यावेळी डी.के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षीसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवीकॉन्ट्रॅक्टर युवराज बोंद्रेगोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.   यावेळी गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थीनी झांजपथक व लेझीम नृत्य सादर केले. 

 

कार्यक्रमाला माजी सैनिकस्वातंत्र्यसैनिकतटरक्षक दलपोलीस दल पत्रकारएनसीसी चे विद्यार्थीअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मांडवी बंदर येथील प्रवासी जेटी दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन

 

रत्नागिरी शहरातील मांडवी येथील प्रवासी जेटी दुरुस्त केलेल्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.  यावेळी आमदार राजन साळवीजिल्हाधिकारी सुनील चव्हाणजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते.

 

  
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा