महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केली जलसंधारण कामांची पाहणी शुक्रवार, १२ जुलै, २०१९


जलसंधारणाच्या कामांमध्ये श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांचा केला सत्कार

बुलडाणा :
पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी, सलाईबन, निंभोरा व काजेगाव गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी या गावांच्या शिवारात पाणी फाऊंडेशन, जलयुक्त शिवार यांच्यामार्फत झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी केली. तसेच केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाचा शुभारंभ केला.

निमखेडी - बऱ्हाणपूर रस्त्यावरील निमखेडी गावच्या शिवारात सामाजिक वनीकरण विभागाने २५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षलागवड मोहिमेला पालकमंत्री यांच्याहस्ते वृक्षारोपण व फलकाचे अनावरण करून सुरूवात करण्यात आली. येथील उजाड माळरानावर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर, तहसिलदार शिवाजी मगर आदी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचप्रमाणे निंभोरा येथे जल संधारण कामांची पाहणी पालकमंत्री यांनी केली. यावेळी केंद्र शासनाने नुकत्याच घोषीत केलेल्या जलशक्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जलपूजनही करण्यात आले. कार्यक्रमावेळी परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काजेगांव येथे पाणी फाऊंडेशनमध्ये जलसंधारण कामांमध्ये श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना पालकमंत्री डॉ. कुटे यांनी जलशक्ती अभियान व जलसंधारणाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमावेळी गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा