महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार : पालकमंत्री अशोक चव्हाण सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

नांदेड : जिल्ह्यातील विकास कामांना गती प्राप्त व्हावी या अनुषंगाने नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत तसेच मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुदखेड येथे केले.

मुदखेड नगरपरिषदेने विकसीत केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते  मुदखेड नगरपरिषद कार्यालयात  झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब रावणगावकर, सभापती श्री.नाईक, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसिलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय नागमवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी नगरपरिषदेच्या विकास कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरोत्थान अभियान राज्यस्तर अभियानांतर्गत उमरी तालुक्यातील बळेगाव येथून मुदखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे. मुदखेड नगरपरिषदेची हद्दवाढ करणे. शहरातील पाणी टंचाईबाबत आढावा. बौद्ध स्मशानभूमी व इतर समाजाच्या स्मशान भूमीसाठी रस्त्यासाठी भूसंपादन करणे. कालेजी देवी ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत पाणंद रस्ता विकसित करणे. रेल्वे भुयारी पोच मार्ग चाल करण्यासाठी भूसंपादन करणे. भोकर चौक ते न्याहाळीकडे जाणारा रस्ता जोडण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम करणे. नगरपरिषदेतील रिक्त पदे भरणे. प्रधानमंत्री आवास योजना राबविणे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुलाची थकीत देयके देणे. श्रीखंडोबा देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करणे. शहरात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. मील्लतनगर ते वसंतनगर तांडा ते उमरीरोडपर्यंत रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्ता विकसित करणे यासह शहरातील विविध विकास कामांचा आढावाही श्री.चव्हाण यांनी घेतला. मुदखेड शहरात चालू असलेली विकास कामे चांगली, दर्जेदार, पारदर्शकपणे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देन नवीन विकास कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी यांनी केली. यावेळी माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी लक्ष्मण देवदे, बालाजी गोडसे, शेख करीम शेख सादात, बंदे अलीखाँ पठाण, इम्रान मच्छीवाले, संजय आऊलवार, चांदु चमकुरे, चांदु बोकेफोड, उमाकांत घोंगडे, उत्तम चव्हाण, बबलु शेठ, रावसाहेब चौदंते, किशोर पारवेकर आदींची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड नगरपरिषद कर्मचारी रामेश्वर वाघमारे, अनंत कुलकर्णी, दिलीप पवार, मोहन कवळे, नितीन चव्हाण, पांडूरंग मोरे, म. यूनूस सैफुलहक, भीसे गंगाधर, रमेश सावंत, मोहन पांचाळ, गणेश वड्डे आदींनी परीश्रम घेतले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा