महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मालेगाव मोसम नदीत चारी खोदणे कामाचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते भूमीपूजन गुरुवार, ११ जुलै, २०१९


मालेगाव :
महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत जिल्हा नियोजन व मालेगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोसम नदीत मध्यभागी चारी खोदणे या कामाचे भूमिपूजन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते काकाणी सिनेमा जवळ मोसम नदीपात्रात झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शेख रशीद शेख शफी हे होते.

श्री.भुसे म्हणाले, नदी चेनलिंग चालू झाल्यानंतर नदीपात्रात जागोजागी पाण्याची डबकी साचणार नाहीत. चारीच्या भागातच असलेला केर कचरा, घाण स्वच्छ करण्यास महापालिकेला फारसे अवघड जाणार नाही. डास, घाण, दुर्गंधी आदींचे साम्राज्य कमी होऊन नदी स्वच्छतेस व शहरवासीयांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या कामाची नियोजित रक्कम एक कोटी २८ लाख आहे. यात जिल्हा नियोजन मंडळातर्फे ७० टक्के तर महापालिकेचा हिस्सा ३० टक्के आहे. नदीपात्राच्या मध्यमभागी दोन मीटर बाय लांब दीड मीटर रुंद चारी खोदण्यात येईल.

मऊ भागात काही ठिकाणी आरसीसी सारखा नाल्याचे स्वरुप असेल. द्याने फरशी पुल ते अल्लमा एकबाल पूल यादरम्यान तीन किलोमीटर चारी खोदाईचे काम करण्यात येणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली.

यावेळी मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थाई समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, गटनेते निलेश आहेर, सुनिल गायकवाड, डॉ. खालिद परवेज मो. युनूस इसा शेख, प्रभाग एक सभापती राजाराम जाधव, शहर अभियंता कैलास बच्छाव, संजय दुसाने, मनोहर बच्छाव, रामा मिस्तरी आदि उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता कैलास बच्छाव, गटनेते सुनिल गायकवाड यांनी कामाची माहिती दिली.


यावेळी नगरसेवक मदन गायकवाड, भीमा भंडागे, संजय काळे, सलिम अन्वर, विनोद वाघ, राजेंद्र शेलार, सुनिल चौधरी, प्रमोद शुक्ला, राजेश गंगावणे, माजी नगरसेविका संगिता चव्हाण, कविता खैरनार, आशा जाधव, अरुणा चौधरी, अंजली कायस्त, सोनाली धात्रक, सोनी सोनवणे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा