महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दापचरी दुग्धप्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न - राज्यमंत्री खोतकर शुक्रवार, १४ जुलै, २०१७
पालघर:- पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यात दापचरी दुग्धविकास प्रकल्पाचा आढावा घेतला.

यावेळी खोतकरांनी दुग्धप्रकल्पाच्या जागेची माहिती घेत प्रकल्पधिकाऱ्यांकडून विविध विभागाची माहिती घेतली. आशिया खंडातील सर्वात मोठा दुग्ध प्रकल्प आणि मुंबईला मुबलक प्रमाणात दूध पुरवता यावे यासाठी 1974 मध्ये महत्वकांक्षी दापचरी दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला होता. सध्या प्रकल्पामधील गोशाळा, रेतन केंद्र, मत्स्य संवर्धन केंद्र, गोशाळा यांच्या दुरूस्तींची गरज आहे.

प्रकल्पातील कृषीक्षेत्र शासने भाड्डे तत्त्वावर अनेकांना दिले आहेत. या भाडेपट्टेधारकांना वीज, पाणी , विविध सुविधांचा देण्याची आवश्यकता आहे. यावेळी राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते दापचरी प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. खोतकर यांनी रोपवाटिकांना भेट दिली तसेच तेथील कामगाराची विचारपूस केली.

राज्यमंत्री खोतकर यांनी प्रकल्प अधिकारी व बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडून प्रकल्पाच्या जमिनीची माहिती घेत दुग्ध प्रकल्पाच्या जागेत असलेल्या गोशाळा, रेतन केंद्र, दुग्ध साठवणूक केंद्र, मत्स्यबीज केंद्र तसेच कृषिक्षेत्रधारक युनिट, कुर्झे धरण याची पाहणी केली तसेच प्रकल्पाच्या जागेत असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करून गाय संवर्धन केंद्र उभारता येईल का याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले. कृषिक्षेत्रधारक असलेल्या कुटुंबाचा ही विचार करण्यात येणार असल्याचे सांगत मत्स्यकेंद्र उपाययोजना करणार असल्याचेही सांगीतले. त्याच प्रमाणे आदिवासी कुटुंबाच्या कब्जात असलेल्या कसणाऱ्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल पाठवून पाठपुरावा करणार असल्याचेही श्री. खोतकर यांनी सांगितले. यावेळी आमदार अमित घोडा, प्रकल्प अधिकारी, बांधकाम अभियंता, कृषिक्षेत्रधारक आदी उप
स्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा