महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजधानीत संत रोहिदास महाराज जयंती साजरी रविवार, ०९ फेब्रुवारी, २०२०


नवी दिल्ली :
संत रोहिदास महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा