महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यच्या `महामानवाला अभिवादन` विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन गुरुवार, १२ एप्रिल, २०१८
अलिबाग : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या `लोकराज्य` या मासिकाचा एप्रिल महिन्याचा विशेषांक `महामानवाला अभिवादन` चे प्रकाशन आज पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीसाठी आज श्री. चव्हाण अलिबाग येथे आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.बाळाराम पाटील, आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील, आ. प्रशांत ठाकुर, आ. धैर्यशील पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, प्रकल्प संचालक `आत्मा` मंगेश डावरे, उपविभागीय कृषि अधिकारी पांडुरंग सिगेदार आदी उपस्थित होते.

लोकराज्यचा `महामानवाला अभिवादन` हा विशेषांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विशेषांकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करण्यात आले असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या योजनांची माहितीही या विशेषांकात देण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा