महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंबड येथील गोदामाची जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षक यांचेकडून पाहणी शनिवार, १३ एप्रिल, २०१९
 

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र असलेल्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामास जिल्हाधिकारी सूरज मांढरे व लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सर्वसाधारण निरीक्षक अभिजित सिंग, राजेशकुमार तसेच दिंडोरी व नाशिकसाठी पोलीस निवडणूक निरीक्षक एन.एस.नपलचायल यांनी भेट देऊन पाहणी केली.

नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे 23 मे 2019 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने सदर मतमोजणी केंद्रात मतदान केंद्रातून येणाऱ्या मतपेट्यांची वाहतूक व पार्किंग व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्था, मतमोजणी केंद्रात पुरेशी हवा व प्रकाश व्यवस्था, इंटरनेट सुविधा तसेच मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाबाबत कायदा व सुव्यवस्था याबाबींचा यावेळी आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत जिल्हाधिकारी व निवडणूक निरीक्षकांनी सूचना दिल्यात.

मतमोजणी केंद्र पाहणीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदी अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा