महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रकाशन सोमवार, १४ मे, २०१८
पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या `लोकराज्य`चा मे 2018 चा विशेषांक ‘4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची’ `सर्वांची साथ सर्वांचा विकास` या विषयावर आधार‍ित असून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन आज विश्रामगृहात करण्यात आले.

यावेळी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विकास वाळूंजकर, सुनील इंदलकर, माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक संग्राम इंगळे उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्त `लोकराज्य`चा मे 2018 चा विशेषांक ‘4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची’ सर्वांची साथ सर्वांचा विकास या विषयावर तयार करण्यात आला आहे. या विशेषांकात गत चार वर्षात केंद्र सरकारने आणि विशेषत: महाराष्ट्रातील मंत्री महोदयांनी जी कामगिरी केली आहे, त्याचा विस्तृत लेखा-जोखा मांडण्यात आला आहे.

या विशेषांकात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वे मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, खासदार मिनाक्षी लेखी, परराष्ट्र मंत्रालयातील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार टेकचंद सोनावणे, पत्रकार विकास झाडे, मंगेश वैशंपायन, अमृता कदम, राहुल परचा, निवेदिता मदाने-वैशंपायन, नरेंद्र जोशी, संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्रकुमार विसपुते, उपसंचालक दयानंद कांबळे, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, उपसंपादक रिेतेश भुयार, हर्षल आकुडे, किरण पवार यांचे लेख आहेत. हा अंक संग्राह्य असून हा विशेषांक सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध असून अंकाच्या मागणीसाठी विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय पुणे येथे संपर्क साधावा.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा