महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मराठी मनाचा ठाव घेणारा लोकराज्य अंक - नाना पाटेकर सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८
पुणे : महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे लोकराज्य हे मासिक मराठी मनाचा ठाव घेणारे अप्रतिम व दर्जेदार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिध्द चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

आज पुणे दौऱ्यावर आले असताना नाना पाटेकरांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना लोकराज्यचा अंक भेट देण्यात आला, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. मी लोकराज्यचा नियमित वाचक असल्याचे सांगून नाना म्हणाले, चालू महिन्याचा साहित्य संमेलन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रसिध्द केलेला लोकराज्यचा अंक वाचनीय आहे. संदर्भ अंक म्हणून लोकराज्य प्रत्येकाने जतन करावा असाच असतो. यापुढेही अशाच प्रकारच्या दर्जेदार अंक वाचकांना देत रहावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, पटकथा लेखक तथा साहित्यिक शाम पेठकर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा