महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मानवंदना शनिवार, १४ एप्रिल, २०१८
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर आणि प्रभारी पोलीस आयुक्त तथा विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक श्री.बच्छाव, सहायक आयुक्त शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त श्री.टाकसाळे, पारस बोथरा, श्रीमती वर्षा ठाकूर, नगर प्रशासनाच्या उपसंचालिका श्रीमती रिता मेत्रेवार आदींनीही पुष्प अर्पण करुन महामानवाला अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदींनीही पुष्प अर्पण करुन महामानवाला अभिवादन केले. याप्रसंगी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा