महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी महसूल विभागाचा घेतला आढावा शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
गडचिरोली : जिल्ह्यात महसूल विभागाच्या विविध बाबींचा आढावा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज एका बैठकीत घेतला. सोबतच जिल्हा परिषद कामकाज आढाव्याबाबत देखील एक बैठक त्यांनी घेतली.

विभागीय आयुक्त अनुपकुमार 2 दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर आलेले आहेत. आज दोन्ही आढावा बैठका येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडल्या.

आरंभी विभागीय आयुक्तांनी आज राष्ट्रीय युवा दिन निमित्ताने स्वामी विवेकानंद तसेच राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊंच्या तसबीरींना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आयुक्त अनुपकुमार यांचे स्वागत केले. एडीट मॉड्यूल, गौण खनीज महसूल, वाळू लिलाव, गडचिरोली-वडसा रेल्वे मार्ग तसेच गोंडवाना विद्यापीठ भुसंपादन आदींसह विविध विषयांचा आढावा या बैठकीत घेतला.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि महसूल विभागाचे इतर अधिकारी आदींची उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा