महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहरात आचारसंहितेचे पालन ; आतापर्यंत ६६२ जाहिरात फलक हटविले गुरुवार, १४ मार्च, २०१९

आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी

अमरावती : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी दि. 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आतापर्यंत सार्वजनिक व खाजगी मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या महापालिकेकडून अमरावती शहरात जाहिरातींचे 662 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीसाठी शासकीय जागेवरील
, आवारातील व शासकीय इमारतीवरील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्स, रंगविलेल्या भिंती, झेंडे काढून टाकण्याचे प्रशासनाकडून निर्देश दिले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे ठिकाण बसस्टॅन्ड, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन, रेल्वेब्रिज, रस्ते, बसेस, विद्युत पोल व टेलिफोन पोल, स्थानिक स्वराज्य संस्थांची इमारत आणि खाजगी मालमत्तेच्या जागेवरील व इमारतीवरील अनाधिकृत राजकीय पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्स, रंगविलेल्या भिंती, झेंडे काढून टाकण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले.

नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासंबंधी तक्रारीबाबत जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक
1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात दिनांक
18 एप्रिल 2019 (गुरुवार) रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून दिनांक 23 मे 2019 (सोमवार) रोजी मतमोजणी होणार आहे.  

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा