महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतले दर्शन शनिवार, २९ जून, २०१९


सांगली :
सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील आरग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या बौद्ध विहाराची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार शरद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ई. गवळी, सरपंच विशाखा कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू आदी उपस्थित होते.डॉ. खाडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी आरग येथे उभारण्यात येत असलेल्या बौद्ध विहारासाठी जवळपास २ कोटी ८ लाख रूपये निधी दिला आहे. हे काम सुसज्ज, देखणे होण्यासाठी सुशोभिकरण, लायब्ररी व अन्य कामासाठी आणखी १ कोटी ४६ लाख रूपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन म्हणून लोक येथे यावेत, एक चांगले वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने याचे काम करण्यात येत आहे. हे काम चांगले होण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे. आरग सुंदर, निटनेटके व ऐतिहासिक व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा