महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेतंर्गत पालकमंत्र्यांचे हस्ते शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

जळगाव : उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत कृषि विभागामार्फत आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव व धरणगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजारे वाटप करण्यात आले. सदरचे औजारे वाटपाचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळेस प्रामुख्याने लहान व मोठे ट्रॅक्टररोटाव्हेटरमळणी यंत्रपेरणी यंत्रकापुस पऱ्हाटी श्रेडर इ. 28 औजारांचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकी हक्काची कृषि यंत्रसामुग्री/औजारे खरेदीस प्रोत्साहित करणे तसेच कृषि औजारांच्या सेवा सुविधा शेतकऱ्यांना प्रचलीत भाडेदरापेक्षा कमी दराने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औजारे बँक स्थापन करणे व त्याद्वारे कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश असणारी कृषि यांत्रिकीकरण योजना जळगाव जिल्ह्यात 2014-15 पासून राबविण्यात येते. सदरची योजना कृषि यांत्रिकीकरण उपअभियानराष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण प्रकल्पराज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना,  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या चार योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येते. या सर्व योजनांमधून जळगाव जिल्ह्यास 657.80 लाखाचा कार्यक्रम मंजूर असून योजनेचा लाभ घेण्यासाठी हजार 661 अर्ज प्राप्त झाले आहे. आज अखेर या योजनेतंर्गत एकूण पॉवर टिलर, 127 ट्रॅक्टर, 430 औजारे, 146 पंपसंच, 2960 पाईप वाटप करण्यात आले आहे. 

औजारे वाटपाचे कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीसंभाजी ठाकूरकृषि उपसंचालकअनिल भोकरेकृषि विकास अधिकारी मधुकर चौधरीतालुका कृषि अधिकारीजळगाव सचिन बऱ्हाटे व तालुका कृषि अधिकारीधरणगाव अभिनव माळी व कृषि विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांचे गरजेनुसार योजनेंतर्गत उपलब्ध औजारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच गटांच्या माध्यमातुनही कृषि औजारे बँक स्थापन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावाज्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे यंत्रसामुग्रीत स्वयंपूर्ण होतील असे सांगितले.  

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा