महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विविध योजनांची माहिती देण्यासाठी चित्ररथाचा शुभारंभ शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०


अमरावती :
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह विविध योजनांबाबत माहिती देण्यासाठी चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.

शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे व शेतीकेंद्रित विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासनाने सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाऊल उचलले. जिल्ह्यात सुमारे १ लाख ५० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. किमान समान कार्यक्रमाद्वारे सर्व घटकांचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हा चित्ररथ जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि. प. माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा