महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा - पियूष सिंह शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९



अमरावती
 : 
अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास विहित मुदतीत करावातसेच हे प्रकरण तातडीने न्यायप्रविष्ठ करावेअसे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी सांगितले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे उपस्थित होते.

श्री.सिंह म्हणालेअनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते. मात्र याचा तपास विहित मुदतीत होत नाही. त्यामुळे न्यायालयात आरोपींच्या बाजूने निर्णय होतात. आरोपींना जामिन मिळण्यासही मदत होते. हे टाळण्यासाठी गुन्हा दाखल होताच संबंधिताला अटक आणि तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. तपास काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्रसाक्षीदार आदी बाबींची पूर्तता करावी.

मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनासेस फंडअपंगांसाठी तीन टक्के निधीरमाई आवास घरकुल योजनाशासकीय वसतीगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा