महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पोलीस विभागाच्या १२.५० कोटींच्या कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९


यवतमाळ :
यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक कार्यालय, पळसवाडी पोलीस वसाहतीचे विस्तारीकरण तसेच यवतमाळ शहर पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीवार उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्य इमारतीचे विस्तारीकरण करण्याकरीता ५ कोटी रुपये, शहर पोलिस स्टेशनची नवीन इमारत बांधण्याकरीता ५ कोटी रुपये व पळसवाडी यवतमाळ येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे विस्तारीकरण व अनुषंगिक कामाकरीता २.४९ कोटी रुपये असे एकूण १२ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, नगरसेवक जगदीश वाधवाणी, अजय राऊत, चंद्रभागा मडावी यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, शहर पोलीस स्टेशन, अवधुतवाडी, लोहारा येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा