महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
माहिती कार्यालयांतील वर्ग-ड संवर्गातील पदांसाठी मुलाखती सोमवार, ०४ डिसेंबर, २०१७
औरंगाबाद - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील ‘वर्ग-ड’ ची रिक्त पदे भरण्याबाबत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयातदेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, अरिहंत बिल्डींग, सिटी सर्व्हे क्र. 2714, हॉटेल सिटीजन्स समोरील गल्ली, खडकेश्वर, औरंगाबाद- 431001 या पत्त्यावर उपस्थित रहावे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा