महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गंगाखेड तालुक्यासाठी तीन वर्षात 690 कोटींचा निधी - बबनराव लोणीकर सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८
समाधान शिबीर पुर्वतयारी बैठकीत विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

जालना -
गेल्या तीन वर्षांच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 690 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला असून आणखी काही कामे प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लवकरच परभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या विविध विकास कामाचे ई- भूमिपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

येथील पूजा मंगल कार्यालयात आयोजित समाधान शिबिराच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, युवा नेते राहुलभैय्या लोणीकर, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, विठ्ठल रबदाडे, डाँ. सुरेश कदम, रामप्रभू मुंडे, जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास मुंडे,डॉ. प्रफुल्ल पाटील,गणेशराव रोकडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. लोणीकर म्हणाले की, समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाख अशा दोन लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. समाधान शिबीर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. समाधान शिबिरातून गोरगरीब, तळागाळातील जनतेला एकाच ठिकाणी विविध कामांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी ५ हजार ३०२ कोटी तर जालना जिल्ह्यात ६ हजार कोटींचा निधी मंजूर केला असून, त्यातील काही कामांचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.

गंगाखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गासाठी 274 कोटी ६३ लाख, नगर पालिका विविध विकास कामांसाठी 21 कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी 13 कोटी 52 लाख, जलयुक्त शिवार कामांसाठी 43 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 कोटी 74 लाख, सा. बा. अंतर्गत विविध कामांसाठी 19 कोटी, दुष्काळ अनुदान 63 कोटी 70 लाख, पीकविमा 118 कोटी, महावितरणची कामे 38 कोटी अशा विविध कामासाठी भरीव निधी दिला आहे. यावेळी श्री. लोणीकर यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांना मंजुरीची प्रमाणपत्रे, उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थयांना गॅस व टाकी, बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा