महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - आयुक्त सुनील केंद्रेकर मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९
 

 

हिंगोली : शासनाच्या विविध योजना या लोकोपयोगी असून जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले

 

मौजे केंद्रा बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात श्री.केंद्रेकर बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळेजिल्हाधिकारी रूचेश जयवंशी,अपर जिल्हाधिकारी जगदीश मिनियारनिवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी,उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारेविभागीय वन अधिकारी केशव वाबळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडेतहसिलदार जिवककुमार कांबळेगजानन शिंदेशिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्केमौजे केंद्रा येथील सरपंच धम्मदीक्षाताई खंदारेयांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

 

श्री.केंद्रेकर म्हणाले कीशासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत सिंचन विहीरबांधावर झाडे लागवड,मागेल त्याला शेततळेपीक विमा आदी शेतीविषयक विविध विभागाच्या योजनांचा लाभ गावातील सर्व नागरिकांनी घ्यावा.

 

यावेळी त्यांनी  ग्रामस्थांशी संवाद साधताना गावातील समस्या जाणून घेताना शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपगावातील पाणीपुरवठावीज व्यवस्था आदी समस्यांचा आढावा घेऊन गावाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यावर उपाय योजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

 

श्री.केंद्रेकर म्हणाले कीजिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतीपीक क्षेत्रावर पंचनामे पूर्ण झाले असून पीक विमा कंपनीशी योग्य समन्वय साधला जात आहे. तसेच मा.राज्यपाल यांच्या सुचनांनुसार तातडीने एनडीआरएफची मदत देण्याची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

प्रारंभी त्यांनी मौजे येलदरी येथील जिल्हा परिषद शाळा व वनविभागाच्या नर्सरीचे तसेच मौजे भानखेडा परिसरातील शेती पिकांची पाहणी केली तसेच  मौजे श्री क्षेत्र नर्सी नामदेव येथील मंदिरास भेट दिली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा