महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्य गौरवास्पद - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०


अकोला :
शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेली बाजार समिती ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, त्याच्या मालाचे नुकसान होऊ नये, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी निर्माण झालेली संस्था, अशा या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून मदत करण्याचे अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

कृषि उत्पन्न बाजार समिती,अकोला येथे लोकनेते स्व. वसंतराव धोत्रे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त विशेष कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप ना.शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोकनेते वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती निळकंठराव खेडकर, अनंतराव भुईकार,संग्राम गावंडे, रमेश हिंगणकर, रामसिंग जाधव, श्रीकांत पिसे, महादेव भुईभार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.शिंगणे म्हणाले की, अकोला बाजार समिती ही शेतकरी हिताचे सर्वाधिक उपक्रम राबवणारी एकमेव बाजार समिती असावी. या बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल यासाठी रयत बाजार सारखे उपक्रम राबवावे,असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी गटतट विसरून एकत्र येऊन काम करणाऱ्या पदाधिकारी संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले. स्व. वसंतराव धोत्रे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गारही ना.डॉ.शिंगणे यांनी यावेळी काढले.

गुटखा बंदी कायदा अधिक कठोर करणार
समाजातील व्यसनाधीनता चिंताजनक आहे. व्यसनाधीनतेच्या या विळख्यातून समाजाला सोडविण्यासाठी गुटखा बंदी चा कायदा अधिक प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यास शासनाने सुरुवात केली आहे. त्यासाठी गुटखा बंदीचा कायदा अधिक कठोर करून कडक शिक्षेची तरतूद करण्याची बाब विचाराधीन आहे,असेही ना.शिंगणे यांनी उपस्थितांना सांगितले.

याप्रसंगी आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती शिरीष धोत्रे यांनी केले. तर सूत्रसंचालन कुवरसिंग मोहने यांनी तर आभार प्रदर्शन उपसभापती निळकंठराव खेडकर यांनी केले.

शेतकऱ्यांना बाजार समिती स्वनिधीतून दिलेली एकूण आर्थिक मदत (३१.०१.२०२० अखेर)
९५८ दुर्धर आजार रुग्ण शेतकऱ्यांना रु.५ हजार प्रत्येकी (वर्ष १९९६ पासुन)-रु.४७,८९,०००,
आत्महत्या केलेल्या २४३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपये (वर्ष २००६ पासुन)-रु.४८,६०,००० ,
सर्पदंश, विज पडुन अथवा अपघाती मृत्यु झालेल्या १९२ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपये (वर्ष २००७ पासुन)-रु.३८,४०,०००,
गुरांचे अपघाती मृत्यु दाखल ४६६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ ते ५००० प्रमाणे (वर्ष २००९ पासून)-रु.२१,१०,०००,
शिष्यवृत्ती वाटप उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकुण १,५६२ पाल्यांना रु.१०००० प्रमाणे (वर्ष २०१६ पासुन)-रु.१,५६,२०,०००,
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता २५,००० व अवजारे करिता १०,००० प्रमाणे अनुदान एकुण ४४० पात्र शेतकरी (वर्ष २०१६ पासुन )-रु.९३,५०,०००,
शेतकऱ्यांना सिंचन करण्याकरिता मोटर पंप खरेदी करिता रु.१०,००० प्रमाणे १३५ शेतकरी- रु.१३,५०,०००.
पुरस्कार व अनुदान वाटप लाभार्थ्यांची नावे-

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत- श्रीमती सविता मंगेश अटकर, श्रीमती सावित्रीबाई तुळशीराम भगत, श्रीमती अंजनाबाई समाधान ढोकणे, श्रीमती मंदाबाई अरूण शेगावकर, विजय श्रीहरी झटाले, श्रीमती चित्रा गाजनन चोपटे, माधवराव गोंविदराव देशमुख, मंगला सिद्धार्थ तेलगोटे , श्रीमती संगीता सुनिल तायडे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत- वंदना गोपाल थोरात, उषा रामेश्वर बोळे, श्रीराम किसनराव चोपडे, सुभाष संपत च्रक्रनारायण, संध्या सदानंद दामोदर, सुरेश शालीग्राम गवळी, अनिल रामराव सांभारे, शारदा नागेश सावंग.

ट्रॅक्टर अनुदान वाटप - दिनेश रामचरण यादव, प्रकाश शांताराम थोटे, अविनाश बळीराम खंडारे, संजय सुर्यभान महल्ले, एकनाथ लक्ष्मणराव गावंडे, समाधान मेंबर तायडे, संतोष मनोहर शिंदे, सुभाष श्रावण भगत, दादाराव गंगारामजी राणे, बळीराम राघोजी शिरसाट.

शिष्यवृत्ती अनुदान वाटप - रेणुका गुलाबराव उमाळे, गौरी सुरेश झांबरे, भारती सदाशिव बाजड, अनिरूद्ध श्याम देशमुख , आनंद राजेश काकड, निखील पुंडलिकराव इंगळे, सौरभ पुंडलिकराव लोथे, पुजा नामदेव निलखन, मयुरी विष्णू बोपटे, तेजश्री संजय तायडे, प्रतिक्षा विठ्ठलराव सोनेकार, अतुल गजानन पागृत , धनश्री धनंजय मेहरे, चैतन्य रविंद्र गांवडे, शे. गुफरान शे. बहार.

विशेष कार्य करणाऱ्यांचा गौरव - एमपीएससी उत्तिर्ण वैशाली विलासराव सांगळे, विद्यापीठातून व्दितीय मेरीट काजल ओमप्रकाश गांवडे , संत गाडगेबाबा आपातकालीन पथकाचे दिपक रामकृष्ण सदाफळे, महाराष्ट्राचा सर्वोकृष्ट वक्ता अक्षय भाऊराव राऊत, गिर्यारोहक धिरज बंडु कळसाईत, बायोडायनामिक जैविक शेती पुरस्कर्ते कु. मानसी चव्हाण.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा