महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
३२१ गावांमधून ८१ हजारावर कुटुंबातील ३ लाख ३६ हजार २९७ जणांचे स्थलांतर - जिल्हाधिकारी दौलत देसाई मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या काळात आतापर्यंत 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील 3 लाख 36 हजार 297 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी 86 बोटी आणि 497 जवान कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या 3 लाख 36 हजार 297 व्यक्तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ – 42 गावातील 40 हजार 452 कुटुंबातील 1 लाख 62 हजार 210 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी – 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 24 गावातील 427 कुटुंबातील 1 हजार 962 सदस्य, पन्हाळा – 44 गावातील 879 कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, हातकणंगले – 23  गावातील 21 हजार 329  कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 55 गावातील 8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार 284 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 5  हजार 641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

यासाठी शिरोळ तालुक्यात 65 बोटी व 385 कर्मचारी, करवीर तालुक्यात 3 बोटी व 25 कर्मचारी, हातकणंगले तालुक्यासाठी 2 बोटी व 15 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 8 बोटी व 32 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी 2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा