महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सर्व सामान्य नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री पंकजा मुंडे शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
बीड, दि. 12 : जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून त्यांचा सर्वांगिण विकास करण्याबरोबरच प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव (घाट) येथे आयोजित राष्ट्र संत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

या कार्यक्रमास आमदार भिमराव धोंडे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, जि.प.सभापती संतोष हंगे, युधजित पंडित, माजी आमदार केशवराव आंधळे, पाटोदा पंचायत समिती सभापती पुष्पाताई सोनवणे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील आळंदीकर, ह.भ.प. बुवासाहेब खाडे महाराज, विजय गोल्हार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुढे बोलतांना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांचे संघर्षमय जीवन होते त्यातून मार्ग काढत त्यांनी चांगला समाज घडविण्याचे काम केले आहे. ते सर्वांना सांगत असत की सर्वांनी शिक्षण घ्यावे शिक्षणामूळे माणसांचा विकास होतो. भगवान बाबांचे शिकवन त्यांचे विचार व शिकवण आपल्या आचरणात आणले पाहिजे, तसेच त्यांचे विचार व शिकवण पुढे नेण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे. असे सांगून सावरगाव (घाट) हे गाव राष्ट्र संत भगवान बाबांचे जन्मस्थळ असून या गावाचा समावेश तीर्थ क्षेत्र विकासामध्ये करण्यात आला असून येणाऱ्या काळात या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. भगवान बाबा जन्मलेल्या वाडयाचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हयातील प्रलंबित असलेली विकासाची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जिल्हयात मोठया प्रमाणात रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाल्याने भूगर्भातील पाणी साठयात वाढ झाली आहे. या कामामुळे शेतक-यांचा व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. जिल्हयात रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून हे रेल्वे मार्ग पुर्ण झाल्यास जिल्हयाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आमदार भिमराव धोंडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे जिल्हयात होत असून नुकतीच शासनाने कर्ज माफीची योजना जाहिर केली असून शेतक-यांना दिलासा देणारी आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गोल्हार यांनी केले यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवरांनी राष्ट्र संत भगवान बाबा यांचे दर्शन घेतले तसेच त्यांनी भगवान बाबा जन्मलेल्या वाडयाची प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली व किर्तनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास जि. प. सदस्य सतिश शिंदे, मधुकर गर्जे, रमेश पोकळे, उध्दव दरेकर, आदिनाथ सानप, शिवनाथ पवार, सुधीर घुमरे, रामदास बडे, संदीप सानप, प्रा. वसंत सानप, सुदाम सानप, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, तहसिलदार रामेश्वर गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल भोकरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा