महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिवादन शनिवार, १४ एप्रिल, २०१८
कोल्हापूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उत्तम कांबळे, पंडीतराव सरुडीकर, विकास चोपडे, अझाद नाईकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव फटाक्यांच्या आकर्षक आतिषबाजीने साजरा करण्यात आला. यावेळी समता सैनिकांनी शानदार संचलन करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा