महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा सोमवार, १५ एप्रिल, २०१९


अमरावती :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान दिनांक १८ एप्रिल रोजी होणार आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे.

दि. १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नवी दिल्ली स्थित भारत निर्वाचन आयोगाने लोकसभा मतदार संघनिहाय मतदान प्रक्रिया व पूर्व तयारीचा आढावा घेतला. देशातील लोकसभा निवडणुका पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात निर्धोकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आदेश भारत निर्वाचन आयोगाने दिले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार, निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल तसेच कायदा व सुव्यवस्था निरीक्षक कुलदीपसिंग सिहाग अकोला येथून व्हीसीमध्ये सहभागी झाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा