महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उधवा येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे विष्णू सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन मंगळवार, ३० ऑक्टोंबर, २०१८पालघर
:
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यातील उधवा सागरसेत, कासपाडा येथे नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व आमदार पास्कल धनारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ह्यावेळी सरपंच सुरेश सिंदा, ग्रामविकास अधिकारी गणपत गवळी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पालघर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या उधवा कासपाडा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी 28 लाख 59 हजार रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे सागरसेत, कासपाडा नवा लोहार पाडा इत्यादी गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे यासाठी 85 हजार लिटर समतेची क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा