महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
पुणे : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्यावतीने येथील ए.आय.एस.एस.एम.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय हातगाम प्रदर्शनाचे सहकार तथा पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय मीणा, माजी आमदार प्रकाश देवळे, वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव बी. बी. चव्हाण, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक आर. एम. परमार, संचालक विजय निमजे, प्रदर्शनाचे व्यवस्थापन अधिकारी बी. एच. घाडे, वासुदेव मेश्राम उपस्थित होते.

सुभाष देशमुख म्हणाले, या प्रदर्शनामध्ये देशातील 13 राज्यातील 74 संस्थांनी भाग घेतला आहे. त्यामुळे देशभराच्या विविध भागातील हातमागाची कला पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे. या निमित्ताने ग्राहकांना माफक दरात गुणवत्तापूर्ण उत्पादने खरेदी करता येणार आहेत. तसेच हातमाग विणकरांनाही या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.

प्रदर्शनाच्या औपचारीक उद्घाटनानंतर मंत्री सुभाष देशमुख यांनी हातमागाच्या विविध स्टॉलला भेटी देऊन विणकर संस्था चालकांशी संवाद साधला. हे प्रदर्शन दि. 10 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 या कालावधीत सुरू राहणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा