महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महिलांनी सामाजिक सक्षमीकरणांसोबत आर्थिक सक्षम होणे आवश्यक - विभागीय आयुक्त अनुप कुमार गुरुवार, ०८ मार्च, २०१८
अकोला : महिलांनी सामाजिक सक्षमीकरणांसोबत आर्थिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागपूरचे विभागीय महसूल आयुक्त अनुप कुमार यांनी केले. जिल्हा नियोजन सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेश खवले, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जळगावचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.गुंजन बारसिंगे, डॉ. आशा मिरगे, जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. वारे, डॉ. शिवाल, डॉ. संगीता भाकरे आदी उपस्थित होते.

समाजातील स्त्रियांविषयी असलेली पुरूषांची मनोवृत्ती बदलेने आवश्यक असून पुरूषांवर समाज संस्कार करण्याची गरज असल्याचे सांगून अनुप कुमार म्हणाले की, स्त्री -पुरूष समतेवर आधारित समाज निर्माण होण्याची गरज आहे. महिलांच्या घरकामाला काम म्हणून पाहणे आवश्यक आहे. तसेच समाजामध्ये स्त्री – पुरूषांमधील श्रम विभाजन अन्याय पूर्ण असून लिंग भेद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून या राज्यात जिजाबाई, सावित्रीबाई फुले यासारख्या सक्षम महिला निर्माण झालेल्या आहेत. तरीही महिला सक्षमीकरणासाठी अजून काम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनाबाबत अनुप कुमार यांनी शुभेच्छा दिल्यात.

यावेळी स्त्री रूग्णालयातर्फे घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धा, स्लोगणस्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. तसेच महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या स्त्रीशक्ती वस्तीस्तर विविध स्पर्धेतील गुणवतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. संजय गांधी योजनेंतर्गत श्रावण बाळ योजनेत आर्थिक प्रवाहात आणलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मतदार जनजागृती अंतर्गत नवीन महिला मतदारांना मतदार कार्डवाटप करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उपअधीक्षक भुमि अभिलेख कार्यालयाच्या भारती खंडेलवाल, प्रीती शिंदे, माविमच्या वर्षा खोब्रागडे, सहकार विभागाच्या श्रीमती मलीये, श्रीमती सोनोने, नेहरू युवा केद्रांच्या नाझिया खान, डॉ. संगीता भाकरे, नवोदय विद्यालयाच्या प्रा. सुमन बैलमारे, सीमा शेटे, डॉ. कल्पना काळे, शालिनी गवारगुरू, इंदूताई येलनकर, किरण गोयनका कुडूपले, रंजना कंकाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेश खवले यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार शामला खोत यांनी केले.

मोर्णा स्वच्छता मिशनची पाहणी

न्यायालयीन प्रकरणातील साक्ष देण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार अकोला येथे आले असताना त्यांनी मोर्णा नदीवरील निमवाडी जवळील नदीच्या काठावर भेट देऊन मोर्णा स्वच्छता मिशनची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मनपाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मिशनच्या झालेल्या कामाबद्दल कौतुक करून अनुप कुमार म्हणाले की, मोर्णा नदी शहरातील घाण पाण्यामुळे अस्वच्छ झाली होती. नदीतील जलकुंभीमुळे नदीला मृत स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने मोर्णा नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले. यामुळे आज ही नदी स्वच्छ झाली आहे. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा