महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी २ मराठी चित्रपटांची व ८ लघुपटांची निवड बुधवार, ३१ ऑक्टोंबर, २०१८


नवी दिल्ली :
49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची व 8 मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

 

आज चित्रपट दिग्दर्शक राहूल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली 13 सदस्यांच्या चित्रपट ज्युरींनी 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये  सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.

 

मराठी चित्रपटांमध्ये निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पाआणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघीया चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे.

 

लघुपटचित्रपटांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवसया मराठी लघुपट प्रदर्शनाने प्रारंभ होणार आहे. मेधप्रणव पोवार यांचा हॅपी बर्थ डे’, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम’, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम’, सुहास जहांगिरदार यांचा येस आय ॲम माऊली’, शेखर रणखांब यांचा पाम्पलेट’, गौतम वझे यांचा आई शपथ’, आणि स्वप्नील कपुरे यांचा भर दुपारीया 8 लघुपटांचा समावेश आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा