महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्रातील 18 कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा पुरस्कार गुरुवार, २० एप्रिल, २०१७
नवी दिल्ली : केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कंपन्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 18 कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने येथील स्कोप कॉमप्लेक्सच्या सभागृहात एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत देशभरातील ४३ संस्थांना सुवर्ण, रजत आणि कास्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच २७ संस्थांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्रातील १८ संस्थांनी यावेळी विविध पुरस्कार पटकाविले.

‘सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग’ विभागात ईलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात कार्य करणाऱ्‍या कंपन्यांना सर्वश्रेष्ठ पुरस्कार स्वरुपात देण्यात येणारे ‘सुवर्ण करंडक’ व प्रशस्तीपत्र महाराष्ट्रातील भिवंडी येथील गोदरेज एण्ड बॉइस ईलेक्ट्रॉनिक निर्मिती कंपनी लिमिटेडला प्रदान करण्यात आले. याशिवाय अन्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील कंपन्यांची नावे खालील प्रमाणे -

रासायनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी सुरक्षा पुरस्काराचे रजत करंडक रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रिम पेट्रोकेमिकल लिमेटेड कंपनीला प्रदान करण्यात आला. पालघर येथील एनपीसीआयएल तारापूर अणू उर्जा प्रकल्प केंद्र ३ व ४ ला उर्जा निर्मिती क्षेत्रातील श्रेष्ठ पुरस्कार स्वरूपात रजत करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले, याच श्रेणीत अभियांत्रिकी व सिमेंट विभागात पालघर जिल्ह्यातील वसई येथील रेचेम आरपीजी प्रा.ली. ला रजत करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

खते व रसायने निर्मिती क्षेत्रात कार्य करणाऱ्‍या कंपन्यांसाठी कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र स्वरूपात देण्यात येणारा सुरक्षा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील तळोजा येथील दिपक फर्टीलायजर्स एण्ड पेट्रोकेमीकल ला प्रदान करण्यात आले. पालघर येथील एनपीसीआयएल तारापूर अणू उर्जा प्रकल्प केंद्र १ व २ ला उर्जा निर्मिती क्षेत्रासाठी कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा पुरस्कारावर मुंबईतील मोनो रेल प्रकल्पात निर्मिती क्षेत्र सांभाळणारे ‘एल एण्ड टी’ कंपनीने नाव कोरले कंपनीला पुरस्कार स्वरूपात कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

‘सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग’ क्षेत्रातील पाच पैकी चार सुरक्षा पुरस्कार महाराष्ट्राला

मुंबईतील विक्रोळी भागातील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील हेंकल एडीसीव टेक्नॉलॉजी प्रा.ली., रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गणेखडपोली येथील क्रिश्ना एंटी ऑक्सीडंट प्रा.ली. आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी लिमीटेड या चार कंपन्यांना ‘सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग’क्षेत्रातील सुरक्षा कास्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

राज्यातील सात कंपन्यांना प्रशस्तीपत्र

निर्मिती क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील घरडा केमीकल्स लिमीटेड आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सासनवाडी येथील प्राज इंडस्ट्रीज लिमीटेड ला प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात मुंबईतील वांद्रे येथील शापूरजी पल्लोनजी एण्ड कंपनी प्रा. ली. ला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ‘सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग’ क्षेत्रातील प्रशंसापत्र पुरस्कार नवी मुंबई जिल्ह्यातील महापे येथील आरएमसी रेडीमिक्स सिमेंट लिमीटेड, मुंबईतील दहीसर येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी, पुणे जिल्ह्यातील वडगाव येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी आणि मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनीला प्रदान करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा