महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्याकडून खेळाडूंना फुटबॉलचे वितरण मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७
महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन

अमरावती :
‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे - पाटील यांच्याकडून फुटबॉलचे वितरण आज करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जयंत डेहणकर यांच्यासह अनेक क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ‘फिफा वर्ल्ड कप’च्या पार्श्वभूमीवर राज्यात खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी व फुटबॉल या खेळाच्या प्रसारासाठी ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी स्वत:कडून खेळाडूंना 200 फुटबॉल देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आज 50 संघांना फुटबॉलचे वितरण करण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. फुटबॉल मिशन वन मिलीयनमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी भाग घ्यावा, असे यावेळी श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन या कार्यक्रमात जिल्ह्यात 15 सप्टेंबरला सुमारे 40 हजार विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा