महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवार, ०५ नोव्हेंबर, २०१८


२५० नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

अकोला :
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सोमवार दि. ०५ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या २५० तक्रारी प्राप्त झाल्या.

तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,जिल्हा पोलीस अधीक्षक एम, राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, अभयसिंग मोहिते आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिकाऱ्यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्वीकारले. १५ दिवसाच्या आत संबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकर्त्यांना ग्वाही दिली. व संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे:- महसूल विभाग - ९६, पोलीस विभाग - २७, जिल्हा परिषद - ५२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ०३, महानगर पालिका - १२, अग्रणी बँक – ०६, विद्युत विभाग - ११, भूमी अभिलेख - ०२, कृषी विभाग - २३, जात पडताळणी समिती - ०३, सार्वजनिक बांधकाम विभाग - ०१, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - ०१ व इतर १३ अशा एकूण २५० तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा