महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
साताऱ्यात ८ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर गुरुवार, २६ मार्च, २०२०

एक अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल

सातारा :
कोविड-१९ या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील ७ निकट सहवासितांचे तसेच एका ६० वर्षीय महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच फिनलँड येथून प्रवास करुन आलेल्या ३२ वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा