महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
`सायन्स एक्सप्रेस" मुळे पर्यावरणाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत - सुरेश प्रभू सोमवार, १७ जुलै, २०१७
सिंधुदुर्ग : आज आपल्या देशात किंबहुना सर्व जगातच पर्यावरण विषयक समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाबाबत जनमानसात जागृती व्हावी विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती व्हावी यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा उपक्रम रेल्वे मंत्रालयाने विविध विभागाच्या सहकार्याने सुरु केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आलेल्या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रिमोटद्वारे केले, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कोकण विभागाचे रेल्वे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रंगराव काळे, रानबांबुळीच्या सरपंच संध्या परब, रानबांबुळीचे उपसरपंच संजय लाड, ओरोसच्या सरपंच मंगला ओरोसकर, प्रभाकर सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा लाभ घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा