महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करावा - सुभाष देशमुख गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
नांदेड : शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. येथील नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्था मर्यादित श्री गुरुजी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.

यावेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, मधुकरराव जाधव, डॉ.सुधीर कोकरे, डॉ.अनिल तोष्णीवाल, डॉ.सुशील राठी, डॉ.संजय चव्हाण, लक्ष्मीकांत बजाज, सरपंच बंडू पावडे, संजय पाचपोर, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.देशमुख म्हणाले, राज्यात सहकार चळवळ समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सर्वांसाठी उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत. त्याचप्रमाणे नांदेड येथे श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा निर्माण झाली आहे. या रुग्णालयाने दर्जेदार वैद्यकीय सेवा देऊन राज्यात व देशात श्री गुरुजी रुग्णालय नावारुपास आणण्याचा प्रयत्न करावा. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, कर्तव्य जपण्याची आपली जबाबदारी असून रुग्ण सेवेसाठी सहकार रुग्णालयास सर्वांनी मदत करावी, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.

श्री.देशमुख यांनी श्री गुरुजी रुग्णालय जनसहभागातून उभे राहिलेले, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी वाहणारे मराठवाड्यातील पहिले सहकारी तत्वावर चालणारे रुग्णालय आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याच्यादृष्टीने संस्था देत असलेल्या योगदानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर कोकरे तर आभार डॉ.मुकूल जोशी यांनी मानले. यावेळी रुग्णालयाचे सभासद, नागरिक आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा