महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा सोमवार, ११ जून, २०१८
नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दि. 24 मे 2018 रोजीच्या पत्रान्वये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवार दि. 25 जून 2018 रोजी मतदान तर गुरुवार दि. 28 जून 2018 रोजी मतमोजणी होणार आहे.

त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारसंघातील मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तरतूद करण्यात आलेली आहे, असे महेन्द्र वारभुवन, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा