महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन आणि  महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    



महाराष्ट्र परिचय केंद्रात
 संविधान दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत  उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा