महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदारांच्या सोईसाठी सर्व माहिती बीएलओंकडे उपलब्ध गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९


बीड :
जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांच्या सूचना फलकावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची (बीएलओ) ची नावे व मोबाईल नंबरची यादी लावण्यात आली आहे. बीएलओ संपर्क साधून मतदार केंद्र, वोटर स्लीप यांची माहिती घेऊ शकतात तसेच त्यांच्याकडून आपले ईपीक ओळखपत्र घेऊ शकतात, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर यांनी सांगितले आहे.

३९-बीड लोकसभा मतदार संघात २३२५ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी केंद्रस्तरीय (बीएलओ) अधिकारी नेमलेला आहे. मतदारांसाठी मतदानाच्या दिवशी आपल्याला कोणत्या केंद्रावर जायचे आहे. त्यासाठी अनुक्रमांकाचे आणि केंद्र क्रमांकाची वोटर स्लीप मतदारांना वाटप करण्यासाठी दिले असून त्याचप्रमाणे नवमतदारांसाठी त्यांचे निवडणूक छायाचित्र ओळखपत्र (EPIC CARD) देखील वितरण करण्यासाठी देण्यात आले आहेत.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा