महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य विशेषांकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
अकोला : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकराज्य च्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे’ या विशेषांकाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते आज विमोचन करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक माहिती अधिकारी नितीनकुमार डोंगरे उपस्थित होते.

या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शैक्षणिक क्रांती विषयावर संपादकीय मधून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. या अंकामध्ये डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, डॉ. भालबा विभूते, डॉ. गो. मा पवार, धनराज माने आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज व शैक्षणिक क्रांती या विषयाच्या अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच उद्योजकता व कौशल्य विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या कर्ज व्याज परतावा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध यशकथा आहे. असा संग्राह्य वाचनीय अंक प्रत्येकाने वाचावा, तसेच लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा